नंदुरबार आदिवासी बांधवांच्या कला आणि संस्कृतीची जपणूक व्हावी, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आदिवासी सास्कृतिक भवनाची संकल्पना पुढे आली असून या भवनामुळे आदिवासींच्या कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले. तळोदा नगर परिषदेतर्फे आदिवासी उपयोजनेतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, सहायक प्रकल्प अधिकारी, नवनाथ जानगर, मुख्याधिकारी सपना वसावा आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, आदिवासी बांधवामध्ये अनेक कला गुण आहेत. त्यांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागात सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना चांगली रुजली त्यासाठी सांस्कृतिक भवन उपयुक्त ठरतील. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली आहे. तळोदा नगर परिषदेस नगरोत्थान य...