Skip to main content

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार.
ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..


ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यां आज हि नंदूरबार जिल्हात खास करून अक्कलकुवा अक्रानी मतदरसंघात मोठ्या प्रमाणात ह्या समच्या पाहायला मिळतात. असलेल्या समच्या कडे गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी यांचा कडून सतत दुर्लक्ष होत आहे. किंवा ह्या समच्या सोडवण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे हेच दिसून येत.. पावसाळ्यातही ग्रामीण भागात कुठलेही नियोजन दिसून येत नाही.
जिल्ह्यतील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली.मात्र या नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहते.नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहाते. घराच्या परिसरात तसेच वस्त्यांतील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोऱ्याची साफसफाई नेहमीच करवून घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते.मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.


तालुक्यातील खेड्यांमध्ये रस्त्याची समस्या मोठी गंभीर स्वरूपाची आहे.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून मार्गाची केलेली डांबर बाहेर आली आहे. त्या रस्त्यांना यावेळी मुरूमाची मलमपट्टी करण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुरू आहे. तर काही ठिकाणी तेही दिसत नाही.खड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरूमही पाण्याने वाहून गेल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ होण्यास मोठा वाव आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आज ही प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणत. मात्र जलवायू प्रदूषणाने विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झाले आहे.शासनाने बऱ्याच योजनेंतर्गत गावाच्या आवश्यकतेनुसार हॅन्ड पंपांची निर्मिती केली. त्या हॅन्ड पंपातून सुरूवातीला पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हायचे. मात्र जसजसे काळ बदलत आहे, तसेतसे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दूषित होऊन आरोग्यास अपायकारक पाणी निघत आहे. तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.  सध्या उपलब्ध असलेले बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्यामुळे आणि त्याच स्त्रोताचे पाणी उपयोगात येत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना पोटाचे विकार, गॅस, एसीडीटी, मुतखडा, अपचन आदी आजार बळावत आहेत. मात्र या प्रकाराकडे कुणीच लक्ष पुरवित नाहीत.
अनेक खेडेगावात पथदिव्यांची सोय स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र तेही दिवे सतत बंद असून केवळ खाबांची शोभाच वाढवित आहेत. त्यासाठी नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत.परिणामी गावात अंधाराचे साम्राज्य कायम राहते.घाणेरड्या रस्त्यावरून वहिवाट करण्यात नागरिकांना कमालीचा त्रास होत असते. परंतु या समस्येवर गांभीर्याने लक्ष देवून समस्या सोडविण्याचे कार्य कुणाकडूनच होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाची भावना निर्माण होत आहे. किमान येणाऱ्या नवीन लोकप्रतनिधींनी तरी या ग्रामीण गावातील असलेल्या समच्ये कडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने या समच्या सोडवण्यात याव्या अशी आशा ग्रामीण गावातील सामन्य, कष्टकरी, शेतकरी लोकांची आहे..

                       
              ✍️....दिलीप व्ही. पावरा

Comments

Popular posts from this blog

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...