सातपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची संस्कृती...
आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र,मध्य प्रदेश व गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते.
पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.
पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला असे म्हणतात.
या सर्वांच्या बोलीभाषांत,पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.पावरा समाजात अजून विविध उपजाती असतात त्यात, बुगवाड्या, दुडवा, पटल्या, वळवका, खर्डे, हेंदऱ्या, पराडक्या, इत्यादी अनेक उपजाती आहेत.या समाजाची खास वैशिष्टय म्हणजे ते आपल्या उपजाती असलेल्यांची लग्न करत नाही उपजात सारखी असली की ते जातीचे भाऊबंद असतात असा त्यांचा समज असतो कुठे ही गेले तरी ते आपल्या उपजाती असलेल्यांची लग्न करत नाही हे पावरा समाजातील एक विशेष आहे.

पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने वृद्ध लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पँट वापरतात.जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.
पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. शरीरावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी अगोदर बोंगऱ्या, भरतो हा पावरा समाजातील एक प्रसिद्ध बाजार असतो मेलादा इ.उत्सव साजरे केले जातात.
होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात .त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ.देवांच्या पूजा होतात. पावरा समाजातील ज्येष्ठ नागरिक आपल्या शेतातील कोणते ही पीक असो मक्के काकळी इत्यादी पिके नवे झाल्याशिवाय खात नाही म्हणजेच त्यांची पूजा करून नवाई पुजली जाते बैलांना खाऊ घातलं जातं मग ते खायला सुरू करतात त्याचा आधी ते शेतातील कोणते ही नवे पीक खात नाही.
पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. यात मुलांचं लग्न असेल तर एक दिवस बैठक बोलवली जाते त्या दिवशी गावकरी नातेवाईक मुलाचा वडिलांना मदत म्हणुन काही जमेल तसे पैसे मदत करत असतात, रात्री ढोल, मांदल वाजवून नाचतात आता मोठ्या प्रमाणात बँड पथक बोलवत असतात, दुसऱ्या दिवशी पण दिवसभर नाचगाण्याचा कार्यक्रम असतो दुपारी 2,3 वाजेच्या दरम्यान मुलीवाले मुलाकडे नवरीला ठेवायला येत असतात. खाण्यापिण्याच्या कार्यक्रम आवरला की नवरीला ठेवतात आणि पहिली पाहुणाय ठरवली जाते म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा, नवरी आणि घरातील काही 2,3 व्यक्ती मुलींचा वडिलां कडे पहिल्यांदाच पाहुणे म्हणून जात असतात तो दिवस ठरवला जातो साधारण तीस, पाच, या सात दिवसाचे ठरवलं जातं.मग लग्न समाप्त होत.
संध्याकाळी नवरीला कुटुंबातल्या सर्व मंडळी व नातेवाईकांचा पाया पडण्याचा कार्यक्रम असतो पूजा केली जाते याला पाय वंदावणे म्हटल जात. दरम्यान याचवेळी नात ही ठरवलं जातं,ज्यांचा पाया पडायचा ते नवरीला काही पैसे देत असतात, व काही तरी मोठी वस्तू घेऊन देण्याचे अथवा गाय,म्हशी,बकरी इत्यादी प्राणी देण्याचे आश्वासन नवरीला दिलं जात असते.मग मुलगी पाया पडते काही प्रमाणात दिलेले आश्वासनपूर्ण ही केलं जातं अश्या प्रमाणे लग्न सोहळा पार पडत असतो.
समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते.विवाहात मुलाचे घरचे मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देत असतात .ही रक्कम समाजाने समाजाची आर्थिक स्थिती पाहून समाजातील वरीष्ठ लोकांनी संपूर्ण समाजाची रक्कम ठरवुन दिलेली असते.त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही.
सद्या पावरा समाजात अकरा हजार एकोणपन्नास रुपये मुलींचा वडिलांना देजो हुंडा म्हणुन वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. एकीकडे सुधारलेला समजामध्ये हुंडा बळी पडून अनेकांचे संसार उघडे पडले असताना पावरा समाजात मात्र हुंडा सारखा प्रकार चालत नाही हे सुधारलेल्या समजाच्या लोकांनी आदर्श घेण्यासारखं आहे. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात मोहाच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हुणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आदिवासी पावरा समाजात असलेल्या काही रुढी परंपरा ह्या पुढारलेल्या समाजास लाजवतील असे आहे. त्यात मुख्य म्हणजे पावरा समाजात मुलींना हुंडा बळी सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागत नाही ..

असा हा सातपुड्यातील आदिवासी पावरा समाज..
✍️....... दिलीप पावरा खडकलाकर
मो. नं. 8275609331
मो. नं. 8275609331
खुपच छान
ReplyDeleteNice खूप छा ना महिती 👍
DeleteNice bro👍
ReplyDeleteSup....dilip.
ReplyDeleteअतिशय महत्वपूर्ण माहिती...!!!
ReplyDeleteKhup chaan dada
ReplyDelete