ग्रामीण भागातील अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात बदल घडवण्यासाठी सातपुड्यातील तरुण मतदार राजाला आवाहन करता आहे.
ग्रामीण भागातील अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात बदल घडवण्यासाठी सातपुड्यातील तरुण मतदार राजाला आवाहन करता आहे.
प्रिय अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघातील गरीब कष्टकरी शेतकरी तरुण बंधू भगनिंनो व माझ्या आदिवासी समाजातील काँग्रेस पक्ष नसानसात असलेल्या अन् इतर समाजविरोधी विचार असलेल्या पक्षातील कार्यकर्ते बांधवांनो तुम्हा सर्वांना आम्ही एक कळकळीची नम्र विनंती करितो की...
एकदा नक्कीच तालुक्याचा आणि आपल्या मतदासंघातील गरीब जनतेचा विकासासाठी तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदा तरी नक्कीच कैलास दादा वसावे यांना निवडून द्या..
गेल्या तीस वर्षापासून मा.आमदार के सी पाडवी साहेबांना निवडून दिलं आहे. परंतु पाहिजे तसा विकास काय आपल्या मतदासंघात झाला नाही. हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे तुम्ही जरी मान्य करत नसतील तरी सत्य जास्त दिवस लपत नाही. ही वास्तव स्थिती तुमच्या आमच्या समोर गेल्या किती तरी वर्षा पासून आहेच.
म्हणून आता आपल्याला एक संधी चालून आली आहे.
मा.कैलास दादा वसावे विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले वकीली केलेले असे समाजाची जान असलेले तरुण तडफदार नेतृत्व नवीन काही तरी समाजासाठी करून दाखवायची उर्जा घेऊन आपल्या मतदासंघात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आपण त्यांना निवडून देवून आपल्या मतदासंघातील असलेल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी एकदा नक्कीच संधी देऊ या आपण जर तीस वर्ष एका व्यक्तीवर विश्वास ठेवून आहोत तर एकदा नवीन नेतृत्व स्वीकारून पाहू या...
आपल्याला काही नवीन बदल करून घ्यायचा असेल अन् मतदरसंघाचा विकास साधायचा असेल तर एक संधी कैलास दादा ला का देऊ नये. जो तरुण आपल्या समाजात बदल घडवण्याचा उद्देशाने एवढी मेहनत करतो आहे.
तीस वर्ष आमदार वर विश्वास ठेवलास ना मग एकदा कैलास दादा वर विश्वास ठेवा नक्कीच बदल घडेल ते घडवतीलच ही अपेक्षा.
मला माहित आहे गेल्या काही वर्षांपासून आमदार साहेबांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात श्रीमंत झाले बंगले बांधले गाड्या घेतल्या सर्व काही केलं..
पण आमचा सामन्य कष्टकरी शेतकरी आदिवासी बांधव आज ही आहे तेच जीवन जगतो आहे असंख्य ग्रासलेला आहे. अत्यंत गरिबीत जीवन जगत आहे. म्हणून आता आपल्या साठी नाही तर मतदरसंघातील गरीब जनतेचा विचार करा आपल्या तालुक्याच्या विचार करा.
हा सर्व बदल घडवून आण्यासाठी आपण सारे विचार करू या एका तरुण वाघाला विधानसभेत पाठवून आपल्या मतदासंघातील विकास साधू या..
"आता नाही तर कधी नाही" हीच संधी आहे आपल्याला नवीन काही तरी करण्यासाठी नाही तर पुढील पाच वर्ष विचार करण्यात निघून जातील.
म्हणून आताच विचार करा ही संधी कधी येईल परत माहीत नाही...
आपल एक अमूल्य मत "झाडू" ला द्या आणि गेल्या तीस वर्षा पासून आपल्या मतदासंघातील झालेली घाण आता साफ करण्याची हीच योग्य वेळ आली आहे.
काँग्रस किंवा इतर पक्षांतील कार्यकर्ते मित्रांनी वाईट वाटून घेऊ नये ही वास्तव स्थिती आहे. तुम्हाला मान्य करावेच लागेल.
आता मतदारसंघात बदल हवा आहे,आम्हाला आता नवीन आमदार हवा आहे..
अशी घोषणा देत तरुण जोमाने कामाला लागले आहे. लागले आहे आणि समाजातील लोकांना नम्र पणे आवाहन देखील करता आहे..
📄✍️.....दिलीप पावरा
Comments
Post a Comment