Skip to main content

ग्रामीण भागात पाण्यासाठी आज ही वणवण.?

नंदुरबार..
डगांवअ गावात पिण्याच शुद्ध पाणी सुद्धा नाही तर अनेक गावात पिण्याच पाण्याची सोय ही नाही..
पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे.पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो,पण असं असलं तरी अजूनही नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा  यातील अक्रानी तालुक्यातील स्थितीत बदल झाल्याचे दिसत नाही इथं आज ही 2,3  किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं.आणि काही  गावांना तर हेही नशिबी नाही उन्हाळात तर येथील पाणी प्रश्न नेहमीच चर्चेत असतो परंतु यावर कायमचा उपाय योजना करण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे. आणि खरं म्हणजे आज ही 80% ग्रामीण गावात नळाने पाणीपुरवठा केला जात नाही आज पण लोकं विहीर हातपंप वर पाणी आणायला जात असतात ते पण अशुद्ध पाणी असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या होतात. आजर मोठ्या प्रमाणात फोफावत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे व काही ठिकाणी तर कोणतीही व्यवस्था पिण्याचा पाण्यासाठी नसल्याची दिसून येते.
अनेक विहिरी आणि हातपंप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने काढण्यात आली आहे परंतु पावसाळा संपला की हे विहीर हातपंप कोरडे पडत असल्याचे चित्र असतं आणि अनेक गावातील हातपंप हे बिघडलेले नादुरुस्त असल्याचे दिसते निम्म्या पेक्षा जास्त ग्रामीण भागात घरांमध्ये पाणीपुरवठा नाही.ज्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळानं होतो. अशी घर तालुक्याचा ठिकाण वगळता जवळजवळ बाकी गावात दिसणार नाही लांबवरून पाणी आणावं लागतं.
भारत स्वतंत्र होवून सत्तरी उलटली तरी  ग्रामीण भागात घरापर्यंत आपण पाणी पोचवलेलं नाही हे दुर्दैव म्हणवे लागेल. घरात शुद्ध पाणी नसल्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे रोगराई होते, त्यावर खर्च होतो, स्त्रियांना फार लांबवरून पाणी आणावं लागत असल्याने त्यांना पाठीचे­-मणक्याचे आजार सारखे होतात आणि अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्यामुळे आणखी अनेक आजार होत असतात आणि ग्रामीण भागातील लोकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या सत्तर वर्षा पासून आपण आपल्या ग्रामीण भागात साधं पिण्याच शुध्द पाणी सुद्धा देऊ शकलो नाही शुद्ध पाणी तर सोडाच परंतु अजून ही असंख्य गावात तर पाण्याची सोय पण नाही हे दुर्दैवच आपले लोकप्रतिनिधी मात्र आज ही अश्या मूलभूत गरजा सोडवून देऊ या मुद्यावर निवडणूक लढवत आहे. आरे जग कुठं चाललय आणि आपण अजून आपल्या तालुक्याच्या गावात पिण्याची पाण्याची सोय सुद्धा केली नाही कधी होईल आपल्या मतदरसंघाचा विकास कधी भेटेल ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच पाणी ग्रामीण भागातील लोकांचा नशिबी शुद्ध पिण्याच पाणी सुद्धा नाही हे बघून ग्रामीण भागातील लोकांची कैफियत समजू शकते काय जीवन जगत असतील ग्रामीण लोक अखेर हा सर्व बदल कधी आणि कोण घडवून आणेल हीच आशा बाळगून आज ही ग्रामीण भागातील लोकं जीवन जगत आहे कोणी तरी बदल घडवून आणेल आपल्या जीवनात हीच आशा आज ही बाळगून आहे..

                        ✍️....दिलीप व्ही. पावरा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...