नंदुरबार
कुपोषणाच्या बाबतीत राज्यात सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे उघडकीस आहे.प्रत्यक्षात मात्र आजही जिल्ह्यात मोठ्या संख्येने कुपोषित बालकांची संख्या असल्याचे समोर आले आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील अक्रानी अक्कलकुवा तालुक्यात कुपोषणाचे गंभीर प्रश्न आजही कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
कुपोषणाच्या बाबतीत राज्यात सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे उघडकीस आहे.प्रत्यक्षात मात्र आजही जिल्ह्यात मोठ्या संख्येने कुपोषित बालकांची संख्या असल्याचे समोर आले आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील अक्रानी अक्कलकुवा तालुक्यात कुपोषणाचे गंभीर प्रश्न आजही कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
सापुड्यातील कुपोषण व बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत.
येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याची शंका वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे.
यावरूनच महिला व बालकल्याण विभाग कुपोषणाचे प्रमाण केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रेखाटत असल्याचे उघड होत आहे.
कुपोषण,बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गेल्यावीस वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी रुपये खर्च झाले.असल्याचे बोलले जात आहे मात्र या विषयाला तात्पुरती"मलमपट्टी'केली जाते मुळापासून उपाय केला जात नाही.कुपोषण-बालमृत्यू टाळण्यासाठी अनेक उपाय योजना आहे.भरारीपथकाद्वारे,घरभेटीतूनतपासणी,प्रसूतीसाठी माहेरघर,आरोग्यसहायकांकडून पाहणी,आशा,आरोग्यसेविकांच्या,घरभेटी बाळांचीनोंदणी,"मानवविकास'कार्यक्रमांतर्गत तपासणी,समुपदेशन,बालोपचारकेंद्र,ग्रामबालक विकासकेंद्र,पोषणपुनर्वसन केंद्र,प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृतआहार योजना,कुपोषणमुक्ती कक्ष,पोषणआहार योजना आदी.परंतु पाहिजे त्या प्रमाणात कुपोषणच्या समस्या मात्र सुटलेल्या दिसत नाही.तर काही योजना ह्या फक्त कागदावरच असून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पाहिजे त्या पद्धतीने ह्या योजनेचे लाभ मिळत नाही.तर काही अंगणवाडी केंद्रात योग्य व पुरेसा आहार दिला जात नसल्यामुळे हे चित्र कायम असल्याचे दिसत.बालविवाह प्रतिबंधक कायदा असून सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याचे दिसून येते कुठेतरी अश्या गोष्टी रोखायला हव्या आणि हया प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील विकासाचा आड येणाऱ्या कारणांपैकी कुपोषण हे मुख्य कारण असल्याचे मानलं जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील कुपोषणावर करोडो पैसे खर्च होत आहे मात्र कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नसल्याचे दिसतं.
बाळांना जन्म देणाऱ्या माताच कुपोषित असतील, तर बाळ कसे पोषित जन्माला येणार,असा प्रश्न कायम उभा राहतो.जननीसुरक्षा,आईची काळजीगरोदर-स्तनदामातांची तपासणी असे उपक्रम राबवले जातात.मात्र मुळात या मातांना,त्यातून पोषणा बाबतची तळमळ भावना जागृत होणे आवश्यक आहे;अन्यथा कितीही योजना आल्या,तरी बालकांचे कुपोषण कायम राहील.योजना राबवणाऱ्यांचे भरण-पोषण होईल,हे वास्तव नाकारता येणार नाही.
जिल्ह्यातील बालमृत्यू
वर्ष - संख्या
2014 - 1024
2015 - 1243
2016 - 788
2017 - 917
2018 - 116
(स्त्रोत : आरोग्य विभाग अहवाल)
जिल्ह्यातील बालकांची स्थिती
शून्य ते सहा महिने - 10,687
सात महिने ते सहा वर्षे - 1,19,463
एकूण बालके - 1,51,893
कुपोषित कमी जोखीम - 14,673
कुपोषित अतिजोखीम - 3,687
✍️.... दिलीप पावरा
✍️.... दिलीप पावरा
Doing well brother ....
ReplyDeleteThanks
ReplyDeleteVery good information and you re doing well for adiwasi piple
ReplyDeleteNice motivation storyline
ReplyDelete