Skip to main content

खडकलाचा युवक दारासिंग वळवी यांची सेट परीक्षेत झेप..

खडकलाचा युवक दारासिंग वळवी  यांची सेट परीक्षेत झेप..

 (धडगावं प्रतिनिधी ) नुकताच 25 तारखेला जाहीर झालेल्या सेट परीक्षेचा निकालात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा  सेट परीक्षेत ग्रामीण भागातील  धडगावं  तालुक्यातील खडकला या गावातील दारासिंग रंगल्या वळवी हा विद्यार्थी यशस्वी झाला.
जिल्हा परिषद शाळा खडकला खु!पासुन सुरू झालेली या युवकाची संघर्षमय यशोगाथा थेट सेट परीक्षा पास होण्यापर्यंत पोहचली
 अतिशय खडतर असा प्रवास करत ग्रामीण भागातील  एका तरुणाने थेट सेट परीक्षा पास केली त्याचा शिक्षणाचा प्रवास एक ते चार प्राथमिक शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषद खडकला येथेच पूर्ण केलं.पुढं पाचवी ते दहावी चे शिक्षण  तोरणमाळ आश्रम शाळेत पूर्ण केल तर अकरावी बारावी एस व्हीं ठकार धडगांव अस करत बीकॉम मध्ये पदवी आणि एम कॉम मध्ये मास्टर की धुळे येथच मिळवली,एवढंच नाही तर बी एड ही धुळे येथेच पूर्ण केलं 
अन् आता थेट सेट परीक्षेत पास याप्रमाणे शिक्षणाची वाटचाल करत कॉमोर्स या विषयात सेट उत्तीर्ण झाला त्याचा या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांन पुढे दारासिंग हा एक आदर्श ठरला आहे.
याचा या यशामुळे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावं आनंद साजरा करत आहे.याचा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे दारासिंगचा यशामागे त्यांना मिळालेले मित्र,कुटुंब अन् खास करून त्यांचे मोठे बंधू सुरेश दादा वळवी हे त्यांचा पाठीची नेहमीच  खंभिर पणे उभे असल्या मुळे आज दारासिंग सेट परीक्षेत यश मिळवण्यास यशस्वी झाला दरासिंगचा यशाने गावाचं नाव निघत असल्याने गावकरी आनंदी होत आहे तर  दारासिंग ने गावाच नाही तर संपूर्ण तालुक्याच नाव पुढे न्याव हीच अपेक्षा मित्र मंडळी आणि गावकरी करता आहे..

✍️..... दिलीप पावरा
Mob: 8275609331


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...