खडकला बु!
दि.१नोव्हेंबर २०१९
रोजी गावकऱ्यांची बैठक पार पडली यात दारू पिण्याचे दुष्परिणाम अन् होत असलेल्या नुकसान विषयी चर्चा करण्यात आली दारू पिऊन गावात भांडत असो या गावातील लोकांची दारू पिऊन होणाऱ्या नुकसान असो याची दखल घेत गावात दारूबंदी करायचं ठरलं.
दारूविक्री बंदी बद्दल ठराव मांडला व बैठकीस उपस्थित सर्व गावकरीच्या एकमताने दारूविक्री बंदी ठराव मंजूर करण्यात आला.
गावातील दारू विकणाऱ्यांना १० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुट देण्यात आली आहे. १० तारखेनंतर दारू विकणाऱ्याला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
त्यांची तक्रार पोलीस स्टेशन ला करण्यात येणार आहे. जो कोणी दारू विकणाऱ्याची माहिती समितीला देईल त्याला ५०० रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे नशा येणार मद्यपेय विकण्यास पूर्ण पणे १० तारखेनंतर गावात बंदी असेल याची दखल गावातील सर्व बांधवांनी घ्यावी अशी विनंती गावातील दारूबंदी समितीने केली आहे.
१० तारखेनंतर गावात कोणताही कार्यक्रम असो दारू या साखर घेऊन जाण्याऐवजी तांदुळ घेऊन जाण्याचं ठरवण्यात आलं.
यावेळी बैठकीस गावातील पाटील, पालसिंग पावरा सह गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते
गावात दारूबंदी करण्याचे पुढाकार गावातील तरुण दिलीप पावरा दिपक पावरा आदी तरुणांनी घेतला यांना तरुण अन् गावातील जेष्ठ मंडळी यांची साथ मिळाली.
दरम्यान आदिवासी समाजाची कुलदेवता याहामोगी माता व जुवार माता यांची शपथ हि घेण्यात आली दारू बंदी साठी एकमताने होकार दिला..
✍️ ...... दिलीप पावरा
Comments
Post a Comment