Skip to main content

सातपुड्यातील आदिवासी समाजाची ओनखी दिवाळी....

सातपुड्यातील आदिवासी समाजाची दिवाळी

दिवाळी म्हंटली की गोडगोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन,भाऊबीज असा अनुभव असतो.मात्र आदिवासी बांधवांचा दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा ही निसर्गपूजकाशी संबंधित असते.सातपुड्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींचे प्रामुख्याने महत्त्वाचे दोनच सण असतात.त्यात एक असतो होळी आणि दुसरा गाव दिवाळी.दिवाळी म्हटली की अस्तंभा ह्या सातपुड्यातील उंच डोंगरावर होणाऱ्या अस्तंभा हे आदिवाासी   महाराजर यांचा मोठ्या दर्स्शना सााठी उसळलेली गर्दी  प्रमाणात येेणं येेणंं गर्दी उसळत असते येथेच गावं दिवाळी ला सुरुवात होत असते आदिवासी समाजातील सोंगाळ्या  पार्टी रात्री आपल्या अभियानातून आदिवासी बांधवांची मोनरंजन करता अन् जनजागृती सुद्धा करत असतात. आदिवासी बांधवांची खरी दिवाळी येथूनच सुरू होत असते मग गावा गावात गाव दिवाळी पुजली जाते.गावदिवाळी म्हणजे आदिवासींसाठी मनसोक्त आनंद लुटण्यासाठी  एक दिवस असतो. निसर्गाची पूजा करून गावावर येणारी आपत्ती, पीडा टळावी, यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
आदिवासींचे दैवत राजापांठा, गांडा ठाकुर, याहामोगी, पांढरी माता यांच्यापासून तर त्यांचे अतिशय महत्त्वाचे सण असलेले होळी आणि दिवाळीचा संबंधही ‘डाब’ या गावाशी जोडला आहे. आदिवासींचे आद्यपुरूष राजा पांठा आणि गांडा ठाकूर यांच्यामुळे गावदिवाळीचा सण सुरू झाल्याच बोललं जात. राजा पांठा आणि गांडा ठाकूर हे राज्याचा फेरफटका मारायला निघत, तेव्हा रात्री मुक्कामाला ज्या गावात थांबत तेथे आनंदोत्सव साजरा केला जाई. त्यालाच गावदिवाळी म्हणण्याची परंपरा सुरू झाली असं सांगता. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत असलेले चार हजार फूट उंचीवरील ठिकाण.मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवरील हे आदिवासी भाविकांचे श्रद्धास्थान असून महाभारतातील चिरंजीव अश्वत्थाम्याचे हे स्थान असल्याचे मानले जाते. दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात येथे मोठी यात्रा भरते.हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. लक्ष्मीपूजनाला या यात्रेचा समारोप झाल्यानंतर पायथ्याशी याच दिवशी पहिला गावदिवाळीचा सोहळा पार पडतो. त्यानंतर सलग चार महिने हा उत्सव विविध गावांमध्ये साजरा केला जातो.ज्या गावात गावदिवाळी असते, त्या दिवशी गावात करमणुकीचे कार्यक्रम होतात. आजूबाजूच्या पाड्यावरील लोक, पै-पाहुणे, सासरी असलेल्या मुली गावात येतात. गावाबाहेर असलेल्या झाडाझुडपातच दिवाळी देव असतो. गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेव, डोंगऱ्यादेव, शिवाऱ्यादेवाची एकत्रित पूजा केली जाते.पूजा झाल्यानंतर गावाचा पाटील किंवा प्रमुखाच्या हस्ते रेडा किंवा कोंबड्याची मान कापली जाते.उरलेले मांस हे गावात प्रसाद म्हणून वाटले जाते.गावातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी सोंगाड्या पार्टी बोलविली जाते. रात्रभर आदिवासी गीते, नृत्य चालते. आदिवासी संस्कृतीवर आधारीत नाटकेही सादर केली जातात. सोंगाळ्या पार्टी पाहण्यासाठी आजुबाजूच्या आदिवासी पाड्यातील लोक इथे जमत असतात एक प्रकारे त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असत पूजा आणि सोंगाड्या पार्टीसाठी लागणारा खर्च हा गावातील लोकांकडूनच वर्गणीतून गोळा केला जातो.आनंद आणि मनोरंजनाबरोबरच आता आदिवासींमध्ये समाजप्रबोधन,अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी मदत होत असते आदिवासी समाजातील ही एक आगळवेगळी परंपरा गेल्या काही दशकांपासूननच सुरू आहे ती आज ही कायम आहे आदिवासी हा निसर्ग पूजक निसर्ग रक्षक म्हणून ओळखला जातो आदिवासी समाज हा सर्व सण निसर्ग पूजनानेच करत असतो म्हणूनच आदिवासी समाजाला एक गौरवशाली संस्कृती आहे आणि ही संस्कृती पुढं ही अशीच टिकून रहावी म्हणून विविध प्रयत्न समाजात केलं जात आहे.
अशी ही सातपुड्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी..


          ✍️...... दिलीप पावरा
             Mo.no. 8275609331

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...