Skip to main content

मांडवी गटातून सुरेश वळवी यांना तिकीट मिळावी समर्थकांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी..

मांडवी गटातून सुरेश वळवी यांना तिकीट मिळावी समर्थकांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी..



नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे संपुर्ण जिल्हात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे अशातच विविध गटातून आपल्या उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावली जात आहे.

 तर काही गटात उमेदवारी साठी रस्सीखेस चालू आहे या सर्व पार्श्वभूमीवर धडगांव तालुक्यातील मांडवी गटाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.गटातून जिल्हा परिषद सदस्य तिकीट साठी काँग्रेसपार्टी कडून बरेच  कायकर्ते इच्छुक असल्याचे सांगितलं जात आहे तिकीट वाटपावरून काल असली येथ आमदार के सी पाडवी  साहेबांचा घरी बैठक पार पडली मात्र मांडवी गटाचे उमेदवारी निश्चित झाली नसून इच्छुक उमेदवार मध्ये तिढा कायम असून पक्ष श्रेष्ठीकडेच उमेदवारी निश्चित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे

शिवसेनेकडून आमदार के सी पाडवी साहेबांचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार विजय दादा पराडके, असल्या मुळे या गटाची निवडणूक रंगतदार होणार असून संपूर्ण जिल्ह्याची नजर या गटाकडे असणार आहे.
काँग्रेस पक्षाकडून वालसिंग रंगल्या वळवी उर्फ ( सुरेश दादा) जामसिंग दादा पराडके, कविता दिलीप पावरा, हे पक्षातील उमेदवार इच्छुक असून आणखी काही जण उमेदवारी साठी तयारी करत असल्याचे कळते मात्र प्रमुख या तिघांपैकी  पक्षश्रेष्ठी नेमके तिकीट कोणाचा पदरात पाडता त्याकडे  कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत.
 मांडवी गटातून सुरेश वळवी बाजी मारतील असे जाणकारांचे मत आहे.कार्यकर्ते स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याचा तयारीत असल्याचे म्हटल जात आहे.त्यामुळे सुरेश वळवी यांनाच तिकिट मिळावी अश्या  मागणीला जोर धरत आहे.ते मांडवी गटातील खडकला  गावातील स्थानिक आहे.
सुरेश वळवी हे गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मांडवी गणातून  रविंद्र पराडके यांच्या कडून अवघ्या काही मतांनी पराभव पत्करला होता.ते ग्रामपंचात मध्ये आपल्या मनमिळावू स्वभावाचा जोरावर अन् केलेल्या कामातून गटातील लोकांची नाळ जुळवललेली असुन.
 एक सर्वसामन्याचा कार्यकर्ता गरज पडेल तेव्हा लोकांना मदत करणारा सुख दुःखात धावून येणारे सर्वांचा मनातील दिलखुलास व्यक्तिमहत्त्व म्हणुन ओळख निर्माण केली असून या जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत मांडवी गटातून त्यांनाच तिकीट द्यावी अशी मागणी मांडवी गटातून होत आहे. काँग्रेस पक्षाने त्यांचा कडे मांडवी पंचायत व गणाची जनसंपर्काची जबाबदारी दिली होती.ती सुरेश वळवीने प्रामाणिक पणे सांभाळली  मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवला आहे.जेव्हा पासून ही धुरा सांभाळली तेव्हा पासून सुरेश वळवी याचं नात मांडवी गटातील लोकांची अधिक जवळीक झालं आहे.मांडवी ग्रामपंचायतीच्या कार्यकर्ता या नात्याने तेथील गरिब दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.याच कार्याची पावतीने गरीब सामान्य लोकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले.
अल्पावधीतच तालुक्यातील सामान्य लोकांच्या व युवक वर्गाचा आवाज म्हणून ओळख निर्माण करून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले या सर्वसामान्य युवकांच्या नेत्यांनी ज्या ठिकाणी स्वतंत्रत्तोर काळापासून वीज पोहचली नाही अशा अंधारात जीवन जगणाऱ्या पाड्यांमध्ये वीज पोहचवण्यासाठी पाठपुराव्याचे अथक प्रयत्न केल अन् वंचित पाड्यांत विज पोहचवली व पाडे विजेने लखलखीत केले समाजातील गोरगरीब जनतेच्या आर्थिक समाजिक समस्या सोडवण्याचे गांभीर्य समजून नेहमीच पुढाकार घेतला अडचणीत सापडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवल्यामूळे जनसामान्यांच्या व युवकांच्या मनात वेगळीच छाप निर्माण केली परिसरातील जनतेच्या समस्या असोत या समाज हिताचे प्रश्न असोत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शासनदरबारी अधिकच सक्रिय राहत असून या भागात भागातील जनतेच्या सुख दु:खात सहभागी होऊन मदत करत असोत शिवाय मांडवी बु ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत नविन विविध काम करून जनतेला रोजगार निर्माण करून गरिब दुर्बल घटकांना अनेक प्रकारचे कामे मिळवून देण्याचे अथक परिश्रम घेत असतात
 तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रम असो,या समाजातील लोकांचा सुख दुःखाचा भाग असो,नेहमीच सहभागी होणारे मदत करणारे, समाजाची जान असणारे,गरज पडली तेव्हा समाजातील लोकांनसाठी धावून येणारे मांडवी ग्रामपंचायतीचा लीडर अशी ओळख निर्माण करून गरीबसामन्य लोकांचा हृदयात स्थान निर्माण करणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व तालुक्यातील सामन्य लोकांचे आवाज बनून जगणारे अगदी कमी कालावधीत आपल स्वतःच अस्तित्व निर्माण करणारे गरिबांचे नेते
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृधापकाळ योजना,संजय गांधी अपंग योजना, इत्यादी  1100 च्या आसपास  लोकांना लाभ मिळवुन देण्याचे काम केले तसेच आपल्या पाठपुरावातून अनेक लोकांना व्यक्तिगत विहीर, बैल जोडी,ऑईल इंजीन,पी.व्ही.सी.पाईप मंजूर करून दिले तर रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे केली असून अश्या अनेक योजनेचा लाभ लोकांना मिळवुन दिला असल्यामुळे मांडवी गटातून जिल्हा परिषद सदस्य साठी वालसिंग रंगल्या वळवी उर्फ (सुरेश दादां) व मांडवी ग्रामपंचायत मधुन दोन वेळा सदस्य निवडून आलेल्या वसंतीबाई वालसिंग वळवी यांनाच उमेदवारी मिळावी अशी मांडवी गटातील समर्थकांची जोरदार मागणी  पक्षश्रेष्ठी होत आहे....

🖋️....दिलीप पावरा खडकलाकर...

       8275609331


Comments

Popular posts from this blog

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...