पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा-पालकमंत्री
नंदुरबार
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागले असताना त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. तर गरीब व गरजू जनतेला अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ सुरू केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त नवीन पोलिस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे आदी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी 2 कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सुसज्ज ग्रंथालय इमारत उभारण्यात येत आहे. आदिवासी क्रीडा अकादमीची स्थापनादेखील करण्यात येणार असून. जिल्ह्यातील 1033 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात रस्ते विकासाच्या कामांना गती देण्यात आली असून विविध शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज इमारती उभारण्यात येत आहेत.रोजगार निर्मिती आणि घरकूल उभारणीतही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले. नंदुरबारच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देताना महाविकास आघाडीचे सरकार सामान्य माणसाच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला वंदन केले
यावेळी पोलीस उपनिरिक्षक सिताराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. संचलनात महिला व पुरुष पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, के.डी.गावीत सैनिकी स्कुल, कमला नेहरु कन्या विद्यालय, हरितसेना आणि पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.
संचलनात जिल्हा पोलिसांची क्षमता दर्शविणारे तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले. यात बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब वाहन, दंगल नियंत्रण वज्र वाहन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा चित्ररथ, 33 कोटी वृक्ष लागवड, कर्जमुक्ती योजना, महाराजस्व अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ आदींचा सहभाग होता.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना
पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे अधिकारी , कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. खडतर कामगिरी बद्दल विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे व पोलीस उप निरिक्षक भुषण बैसाणे यांना प्रदान करण्यात आले.हातोडा फेकीत सुवर्ण पदक मिळविणारे भुषण चित्ते,ज्युदो कलस्टर मध्ये कांस्य पदक विजेत्या निंबाबाई वाघमारे यांनादेखील विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतंर्गत मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.जिल्हा अधिक्षक कृषी विभागातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या कृषी उपसंचालक मोहन रामोळे, कृषी पर्यवेक्षक उमेश भदाणे, कृषी सहाय्यक प्रमोद पाटील, शिलदार पावरा, पंकज बोरसे, रमेश शिरसाठ, विजय भलकारे, रायमल पावरा, तंत्रसल्लागार लक्ष्मीकांत बडगुजर यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्यामार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या एकलव्य विद्यालयातील अनुराग चौधरी,भावेश मोरे, राहूल चौधरी तर डॉ. काणे गर्ल्स हायस्कुलच्या प्राजल अहिरे,दिव्या सोनार, कल्याणी जाधव यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, वीर पत्नी यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कला-संस्कृतीचे दर्शन
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देशाच्या कला व संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कुल यांच्यामार्फत जागर संविधानाचा हे पथनाट्य तर एस.ए. मिशन हायस्कुल, डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल ॲग्लो उर्दु हायस्कुल यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. के. आर. पब्लिक स्कुल यांनी एरियल सिल्क प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. शासकीय आश्रम शाळा भालेर यांनी देशभक्तीपर लेझिम नृत्य सादर केले. तर
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. माधव कदम यांनी पार पाडले..
कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा-पालकमंत्री
नंदुरबार
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागले असताना त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. तर गरीब व गरजू जनतेला अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ सुरू केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त नवीन पोलिस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले,कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड केलेली रक्कम दोन लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. रक्कम दोन लाखापेक्षा अधिक असल्यास अशा शेतकऱ्यांना योग्य योजनेद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येणार असल्याचे ते सांगत होते.
जिल्ह्यात दोन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू करण्यात येत असून केवळ 10 रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर दररोज 500 थाळी भोजन वितरीत करण्यात येणार असून प्रत्येक थाळीमागे शासनातर्फे 35 रुपये अनुदान देण्यात येईल.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी 2 कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सुसज्ज ग्रंथालय इमारत उभारण्यात येत आहे. आदिवासी क्रीडा अकादमीची स्थापनादेखील करण्यात येणार असून. जिल्ह्यातील 1033 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात रस्ते विकासाच्या कामांना गती देण्यात आली असून विविध शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज इमारती उभारण्यात येत आहेत.रोजगार निर्मिती आणि घरकूल उभारणीतही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले. नंदुरबारच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देताना महाविकास आघाडीचे सरकार सामान्य माणसाच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला वंदन केले
यावेळी पोलीस उपनिरिक्षक सिताराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. संचलनात महिला व पुरुष पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, के.डी.गावीत सैनिकी स्कुल, कमला नेहरु कन्या विद्यालय, हरितसेना आणि पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.
संचलनात जिल्हा पोलिसांची क्षमता दर्शविणारे तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले. यात बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब वाहन, दंगल नियंत्रण वज्र वाहन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा चित्ररथ, 33 कोटी वृक्ष लागवड, कर्जमुक्ती योजना, महाराजस्व अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ आदींचा सहभाग होता.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना
पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे अधिकारी , कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. खडतर कामगिरी बद्दल विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे व पोलीस उप निरिक्षक भुषण बैसाणे यांना प्रदान करण्यात आले.हातोडा फेकीत सुवर्ण पदक मिळविणारे भुषण चित्ते,ज्युदो कलस्टर मध्ये कांस्य पदक विजेत्या निंबाबाई वाघमारे यांनादेखील विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतंर्गत मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.जिल्हा अधिक्षक कृषी विभागातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या कृषी उपसंचालक मोहन रामोळे, कृषी पर्यवेक्षक उमेश भदाणे, कृषी सहाय्यक प्रमोद पाटील, शिलदार पावरा, पंकज बोरसे, रमेश शिरसाठ, विजय भलकारे, रायमल पावरा, तंत्रसल्लागार लक्ष्मीकांत बडगुजर यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था यांच्यामार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या एकलव्य विद्यालयातील अनुराग चौधरी,भावेश मोरे, राहूल चौधरी तर डॉ. काणे गर्ल्स हायस्कुलच्या प्राजल अहिरे,दिव्या सोनार, कल्याणी जाधव यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, वीर पत्नी यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कला-संस्कृतीचे दर्शन
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देशाच्या कला व संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कुल यांच्यामार्फत जागर संविधानाचा हे पथनाट्य तर एस.ए. मिशन हायस्कुल, डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल ॲग्लो उर्दु हायस्कुल यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. के. आर. पब्लिक स्कुल यांनी एरियल सिल्क प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. शासकीय आश्रम शाळा भालेर यांनी देशभक्तीपर लेझिम नृत्य सादर केले. तर
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. माधव कदम यांनी पार पाडले..
Comments
Post a Comment