एचपीटी महाविद्यालयात सांस्कृतिक डेज उत्साहात
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध सांस्कृतिक दिवस( डेज) डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत उस्पुर्त पणे साजरा करण्यात आले.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रशांत देशपांडे यांनी यावर्षीचा डेज मध्ये नावीन्यपूर्ण बदल केला त्यात उत्तम वेशभुषा, आणि उत्त्तम संवाद ही स्पर्धा घेऊन. प्रथम, द्वितीय,आणि तृतीय नंबर काढून त्यांना ट्राफी व प्रमाणपत्र देण्यात आले विद्यार्थ्यांन मध्ये उत्तम संवाद साधण्याच्या विकास व्हावा हा हेतू या बदला मधे होता.
विद्यार्थ्यांनी डेज मधे मोठ्या संख्येने सहभाग घेऊन
महाविद्यालयाचा परिसर नव्याने फुलवून दिला,मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध सांस्कृतिक डेज मधे सहभागी होवून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले व डेज निमित्ताने विविधतेतून एकतेचा व सामाजिक संदेश दिला.
विविध भारतीय संस्कृतीतील पारंपारिक वेशभूषा परिधान करून या दिवसाचे आठवण आपल्या मित्र, मैत्रिणी सबोतचा फोटो कॅमेरात कैद करून हे दिवस आपल्या आयुष्यातील अवीस्मरीय आठवण ठरवली हे दिवस कायमचं स्मरणात असेल या आनंदात साजरा केले.
यात ट्रॅडिशनल डे,प्रोफेशनल डे, रेट्रो डे,फन फेअर डे,हे सांस्कृतिक डेज साजरा झाले यानिमित्ताने महाविद्यालय जणू काय विविध रंग बेरंगी रंगात फुलून आल्यासारखं वातावरण महाविद्यालयाचा परिसरात बघायला मिळत होते.विद्यार्थी विविध वेशभूषा परिधान करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते व विविध धर्मांचे वेशभूषा परिधान करून सर्व धर्म समभाव हा संदेश ही देत होते.
तर काही सिने क्षेत्रातील वेशभुषा परिधान करून जणू काय महाविद्यालयात सिने क्षेत्रातील मंडळी अवतरल्या सारखे सिने अभिनेता स्टाईल मध्ये विद्यार्थी उपस्थित राहून डेज साजरा केले होते.
जुन्या काळातील लोप पावत चालली सस्कृतीची आठवण या दिवसात विद्यार्थी आपल्या कलेतून व पेहरावतून करून देत होते.
डेज निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यात प्रामुख्याने बातमी वाचन, काव्य वाचन, हस्ताक्षर लेखन,वक्तृत्व स्पर्धा, प्रभावी व्यक्तिमत्त्व ह्या स्पर्धा घेण्यात आल्या या सर्व स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
फन फेअर डे (आनंद मेळा) घेण्यात आला यात विद्यार्थी स्वतःच अन्न पदार्थ तयार करून महाविद्यालयात स्टॉल तयार करून आपल अन्न पदार्थ विकत होते.
31 डिसेंबर ला स्पंदन हा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक डेजची सांगता करण्यात आली या निमित्ताने नृत्य, गायन, रॅप इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यात ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थांनी सहभाग घेतला एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्व पार्शवभूमीवर पूर्ण आठवडाभर चालू असलेल्या डेज मधे विद्यार्थांना आपल्या कडे असणाऱ्या विविध कलागुणांचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.विद्यार्थी कलागुणांचा विकास साधणे हाच मुख्य उद्देश महाविद्यालयात डेज व विविध स्पर्धा घेण्या मागचा उद्देश होता.
हा सर्व कार्यक्रम विद्यार्थी विकास विभागाचा वतीने विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रशांत देशपांडे यांनी आयोजित केला. त्यांना प्राचार्य.व्हीं एन सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे, मृणाली देशपांडे यांचे मार्गर्शन लाभले तर सर्व प्राध्यापक, व महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग यांचा सकारात्मक सहभाग यात होता .
या सर्व कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धेचे प्रथम, द्वितीय,आणि तृतीय नंबर काढण्यात आले व या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी झालेल्या वार्षिक स्न्हेसंमलेनात परम पूज्य स्वामी सुरुपांनद सरस्वती,श्रुती सागर, मा. सर डॉ. एम एस गोसावी या मान्यवरांचा हस्ते ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला...
दिलीप व्ही. पावरा (MA-JMC)I
Mo.no.8275609331
Comments
Post a Comment