खडकलाचा युवक दारासिंग वळवी यांची सेट परीक्षेत झेप.. ( धडगावं प्रतिनिधी ) नुकताच 25 तारखेला जाहीर झालेल्या सेट परीक्षेचा निकालात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सेट परीक्षेत ग्रामीण भागातील धडगावं तालुक्यातील खडकला या गावातील दारासिंग रंगल्या वळवी हा विद्यार्थी यशस्वी झाला. जिल्हा परिषद शाळा खडकला खु!पासुन सुरू झालेली या युवकाची संघर्षमय यशोगाथा थेट सेट परीक्षा पास होण्यापर्यंत पोहचली अतिशय खडतर असा प्रवास करत ग्रामीण भागातील एका तरुणाने थेट सेट परीक्षा पास केली त्याचा शिक्षणाचा प्रवास एक ते चार प्राथमिक शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषद खडकला येथेच पूर्ण केलं.पुढं पाचवी ते दहावी चे शिक्षण तोरणमाळ आश्रम शाळेत पूर्ण केल तर अकरावी बारावी एस व्हीं ठकार धडगांव अस करत बीकॉम मध्ये पदवी आणि एम कॉम मध्ये मास्टर की धुळे येथच मिळवली,एवढंच नाही तर बी एड ही धुळे येथेच पूर्ण केलं  अन् आता थेट सेट परीक्षेत पास याप्रमाणे शिक्षणाची वाटचाल करत कॉमोर्स या विषयात सेट उत्तीर्ण झाला त्याचा या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांन पुढे दारासिंग हा ...