नंदुरबार आदिवासी बांधवांच्या कला आणि संस्कृतीची जपणूक व्हावी, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आदिवासी सास्कृतिक भवनाची संकल्पना पुढे आली असून या भवनामुळे आदिवासींच्या कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले. तळोदा नगर परिषदेतर्फे आदिवासी उपयोजनेतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, सहायक प्रकल्प अधिकारी, नवनाथ जानगर, मुख्याधिकारी सपना वसावा आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, आदिवासी बांधवामध्ये अनेक कला गुण आहेत. त्यांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागात सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना चांगली रुजली त्यासाठी सांस्कृतिक भवन उपयुक्त ठरतील. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली आहे. तळोदा नगर परिषदेस नगरोत्थान य...
नंदुरबार पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. याचा नंदुरबार सातपुड्यातील आदिवासी गोरगरीब सामन्य रुग्णांना मोठा फायदा होणार असून बिपीयल कार्ड धारकांन साठी मोफत सुविधा केली, असून सातपुड्यातील गरीब जनतेला नक्कीच फायदा होणार असून याचा सर्व रुग्णांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात अद्ययावत सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल पालक मंत्री के सी पाडवी यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये यांचे अभिनंदन केले.मोठ्या खाजगी रुग्णालयात उपलब्ध होणारी सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होत असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणाले. यावेळी नंदुरबारचे खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, पद्माकर वळवी, राम रगुवंशी जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आदी उपस्थित होते.